- वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) बुधवारी सांगितले की, ते एक स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल ‘फ्लिपकार्ट एक्सट्रा’ (Flipkart Xtra) सादर करत आहेत. जेणेकरून इनडिव्हिज्युअल, सेवा संस्था आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
- बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननंतर इनडिव्हिज्युअल विविध भूमिकांसाठी स्वतःला ऑनबोर्ड करण्यास सक्षम असतील, असे एका निवेदनात म्हटले आहे. जे येत्या काही महिन्यांत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसह सुरू होईल आणि नंतर सर्विस पार्टनर किंवा टेक्नीशियनन्सचा समावेश असेल. त्यात म्हटले आहे की नवीन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टची पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत करेल. यासह, पार्ट टाइम जॉब्स निर्माण केले जाऊ शकतात.
- सणासुदीचा हंगाम आणि कंपनीच्या बिग बिलियन डेजच्या अगोदर लाँच केल्याने देशभरातील हजारो व्यक्ती, तंत्रज्ञ आणि सेवा एजन्सींना डिलिव्हरी पार्टनर म्हणून अतिरिक्त काम आणि कमाईच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
- डिसेंबर 2021 पर्यंत फ्लिपकार्ट एक्स्ट्राद्वारे 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
फ्लिपकार्ट भिवंडी आणि नागपूरमध्ये फॅक्टरी सुरु करणार
- ईकॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट महाराष्ट्रात चार नवीन फॅक्टरी सुरु करत आहे. यामुळे ४ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. कंपनीचे फूलफिलमेंट आणि सोर्टेशन केंद्र भिवंडी आणि नागपूरमध्ये असणार आहे. यामुळे राज्यातील स्थानिक विक्रेत्यांना आधार मिळेल आणि ई-कॉमर्स क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. ही सुविधा ७ लाख चौरस फूट क्षेत्रात आहेत. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ४ हजार रोजगार निर्माण होतील असे कंपनीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.
- कंपनीने सप्लाय चेनचा विचार करुन महाराष्ट्रात प्रमुख केंद्र म्हणून निवडले आहे. नव्या फॅसिलिटी आणि सध्या असलेल्या फॅसिलिटीच्या विस्तारामुळे सप्लाय चेन फॅसिलिटीची संख्या १२ झाली आहे. ही फॅसिलिटी २३ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरली आहे. यामध्ये २० हजारहून जास्त लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नोकरी करत आहेत.
E commerce company Flipkart is starting four new factories in Maharashtra. Flipkart will provide employment to 4,000 people. The company will have flower fulfillment and sorting centers at Bhiwandi and Nagpur. Walmart owned e-commerce company Flipkart said on Wednesday that it was introducing a separate marketplace model, Flipkart Xtra. So that earning opportunities are available to individuals, service organizations and technicians