राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमीत (naval academy) महिला आता सहभागी होऊ शकणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमीत (naval academy) महिला आता सहभागी होऊ शकणार आहेत. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा, 2021 साठी अर्ज करण्यासाठी एक विंडो उघडली आहे.
याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (union public service commission) एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान महिला उमेदवारांसाठी अर्जाची विंडो खुली राहील, असे आयोगाने म्हटले आहे.


एनडीए आणि नौदल अकादमीत प्रवेश देण्यासाठी पुढील वर्षापर्यंत स्थगिती देण्याची विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. मात्र, बुधवारी न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. त्यानंतर आजपासून महिलांना २०२१ मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

सैन्य दलांनी स्वतःहून महिलांना एनडीएत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. सैन्य दलांनी लैंगिक समानतेच्याबाबतीत अधिक सक्रिय दृष्टीकोण अवलंबला पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. के. कौल म्हणाले होते. या प्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी २२ सप्टेंबरला सुनावणी झाली. आधीच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं एनडीए म्हणजे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेला बसण्याची परवानगी महिलांना दिली होती. एनडीए परीक्षेसाठी महिला पुढील वर्षी मे महिन्यात प्रवेश परीक्षा दिल्यानंतर, जानेवारी 2023 मध्ये महिला कॅडेट्सच्या पहिल्या बॅचचं स्वागत करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असेल, अशी ग्वाही सरकारनं सोमवारी (ता. 20) सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. पण केंद्र सरकारची ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने सांगितलंय की, या परीक्षेबाबत परीक्षा यावर्षी म्हणजे 2021 मध्येच होणार असून यामुळे महिलांचा सैन्यात भरती होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

सोर्स सकाळ न्युज

Top Post Ad

Below Post Ad