भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. १३ ऑक्टोबरपासून अर्जाची लिंक सक्रिय होणार असून १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
FSSAI ने अन्न विश्लेषक (Food Analyst), तांत्रिक अधिकारी(Technical Officer), केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (Central Food Safety Officer), सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager), सहाय्यक व्यवस्थापक IT (Assistant Manager IT), हिंदी अनुवादक (Hindi Translator), वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) आणि इतर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.
या भरतीची अर्ज प्रक्रिया १३ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होणार आहे. १२ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
एफएसएसएआयने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, फूड अॅनालिस्ट आणि टेक्निकल ऑफिसर पदाच्या एकूण १२५ जागा भरल्या जाणार आहेत.
त्याचबरोबर सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आयटी, हिंदी ट्रान्सलेटर अनुक्रमे ३७, ४, ४, ३३, १ पदांची भरती केली जाणार आहे.
याशिवाय पर्सनल असिस्टंटची १९ पदे आणि आयटी असिस्टंटची ३ पदे भरती केली जातील.
हिंदी ट्रान्सलेटर आणि इतर पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. यासाठी सर्वातआधी अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जा. आता वेबसाइटवरील 'जॉब्स' टॅबवर क्लिक करा. एक नवीन पेज खुले होईल. उमेदवार आता जाहिरात क्रमांक- HR-12013/6/2021-HR-FSSAI [DR-04/2021] वर जा. १३ ऑक्टोबरपासून ही लिंक सक्रिय करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना आवश्यक तपशीलांसह अर्ज भरता येईल. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना १५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागते. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, ओबीसी उमेदवारांना १ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, एससी, एसटी, माजी सैनिक, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्युएस या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क भरावे लागेल.
सोर्स - महाराष्ट्र टाईम्स