बँकिंग विभागात नोकऱ्यांचा शोध घेत असलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. युनियन बँकेमध्ये विविध स्पेशालिस्ट पदांसाठी भरती निघाली आहे. युनियन बँकेच्या मुंबईस्थित मुख्यालयामधून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Union Bank of India Recruitment 2021) युनियन बँक भरती २०२१ साठी अर्ज unionbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करता येतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे. (government jobs update) नोटिफिकेशननुसार युनियन बँक भरती २०२१ अंतर्गत एकूण ३४७ पदे भरली जाणार आहेत. ही भरती एमएमजीएस-III आणि एमएमजीएस -II व एमएमजीएस-I ग्रेड अंतर्गत होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना युनियन बँकेच्या कुठल्याही शाखेत नियुक्त करण्यात येणार आहे. (Job opportunities in the banking sector, bumper recruitment in Union Bank; Such is the eligibility and conditions)
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात १२ ऑगस्ट २०२१ पासून झाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ही ३ सप्टेंबर २०२१ आहे.
या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या पदांचे विवरण हे पुढील प्रमाणे आहे.
जॉब पोस्ट | पद |
---|---|
सिनियर मॅनेजर (रिस्क) | ६० |
मॅनेजर (रिस्क) | ६० |
मॅनेजर (सिव्हिल इंजिनियर) | ०७ |
मॅनेजर (आर्किटेक्ट) | ०७ |
मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनियर) | ०२ |
मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) | ०१ |
मॅनेजर (फॉरेस्क | ०१ |
मॅनेजर (सीए) | १४ |
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) | २६ |
असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स) | १२० |